पुणे : पुण्यात फसवणुकीचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सायबर चोरीच्या तीन घटनांत तिघांची तब्बल 80 लाख रुपयांची फसवणूक झाली असून, ट्रेडींग टास्क, शेअरमधील नफा तसेच मनीलॉन्ड्रींगच्या प्रकरणात कारवाईची भिती दाखवून ही फसवणूक केली आहे.
पहिल्या घटनेत 32 वर्षीय तरुणाने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या तरुणाला वर्कफ्रॉम-होमचे आमिष दाखविले. त्याला क्रिप्टोकरन्सी ट्रेडींगचे टास्क दिला व त्या बदल्यात चांगले कमीशन देतो असे सांगितले. सायबर ठगांनी तरुणाकडून वेळोवेळी 27 लाख 7 हजारांचा गंडा घातला.
तर, दुसर्या घटनेत पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून रविवार पेठेतील तरुणीला टास्क फ्रॉद्वारे सायबर ठगांनी 3 लाख 62 हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत 36 वर्षीय तरुणीने खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी मोबाईलवर वर्क फ्रॉम होमचा संदेश पाठवला. नंतर तिला आर्थिक प्रलोभन दाखवत पेड टास्कच्या माध्यमातून जास्त पैसे मिळतील असे सांगण्यात आले होते.