अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…

0
62

अमरावती : नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील गोल्डन फायबर या कंपनीतील सुमारे शंभरावर कामगारांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. या कामगारांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाण्यातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात अनेक महिलांना पाणी पिल्यानंतर उलट्यांचा त्रास होत असल्याचे निदर्शनात आले आहे. मात्र, ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काही महिलांना सकाळी नाष्टा केल्यानंतर मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. या घटनेची माहिती मिळताच गोल्डन फायबर कंपनीच्या व्यवस्थापनाने डॉक्टरांना पाचारण केले. काही महिलांवर कारखान्यातच उपचार करण्यात आले. पण, विषबाधा झालेल्या कामगारांची संख्या अधिक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

नांदगावपेठ येथील वस्त्रोद्योग संकुलात गोल्डन फायबर एएलपी ही कंपनी आहे. या कंपनीत सुमारे सातशे कामगार कामाला आहेत. या कारखान्यात लीनन यार्नचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीत ग्रामीण भागातील कामगार कामाला आहेत. बहुतांश महिला कामगार आहेत. आज सकाळी कंपनीत पोहचल्यानंतर महिला कामगारांनी तेथील पाणी पिल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला, तर काही कामगारांना नाष्टा केल्यानंतर उलट्यांचा त्रास सुरू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here