Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले

0
101

Shubman Gill should focus on his batting not hairstyle : ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने भारतीय संघाच्या युवा फलंदाजाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याच्या मते युवा खेळाडूने आपले लक्ष दुसरीकडे वळवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. भारताचे भविष्य मानल्या जाणाऱ्या शुबमन गिलने केसांवर नव्हे तर फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे गिलख्रिस्टने म्हटले आहे.

शुबमन गिलसाठी नुकताच संपलेला ऑस्ट्रेलिया दौरा चांगला नव्हता. गिलने तीन सामन्यांत केवळ ९३ धावा केल्या होत्या. या काळात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातही गिलला वगळण्यात आले. गिलख्रिस्ट म्हणाला की, गिलने केसांपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here