Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त

0
65

नाशिक: राज्यात लोकसभा, विधानसभेनंतर आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. महानगरपालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील (Hemlata Patil) या काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या दोन दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देण्याचा तयारीत असल्याच्या आणि त्यांचा पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यावर हेमलता पाटील (Hemlata Patil) ठाम होत्या. दुपारी चार वाजेपर्यंत मला विधानसभा तिकीट देण्याचे नक्की असताना अचानक शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडल्याचा हेमलता पाटील (Hemlata Patil) यांचा आरोप आहे. 

पक्ष नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष

विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील (Hemlata Patil) नाराज होत्या. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे. “पक्ष नेतृत्वाने पूर्णतः दुर्लक्ष केलं. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मश्गुल आहेत” अशा शब्दात हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, राज्यातील पक्ष नेतृत्वाने फसवल्याचा हेमलता पाटील यांचा गंभीर आरोप आहे. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्ष नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कुठल्या पक्षात जायचं याबाबत अद्याप निर्णय नाही, इतर पक्षाकडून पक्षात प्रवेशासाठी संपर्क साधत असल्याचा पाटील (Hemlata Patil) यांचा दावा आहे. 

विधानसभेला बंडखोरी केली पण…

विधानसभा निवडणुकीच्यावेळी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज देखील हेमलता पाटील यांनी भरला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. मात्र शेवटी त्यांनी 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here