वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला…….

0
68

Dhananjay Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले आहे . राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या वाल्मीक कराडांवर नको का अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर परळीसह शहरात मोठा गदारोळ उडाला होता .(Parli)  दुसरीकडे सुरेश धस यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते .

या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. दरम्यान , 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथच्या दर्शनासाठी मंत्री धनंजय मुंडे आज परळीत दाखल झाले होते . परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा केल्यानंतर ते परळीतील त्यांच्या जगन मित्र या कार्यालयात बसणार आहेत . तिथे परळीतील त्यांचे कार्यकर्ते, कामानिमित्त येणाऱ्या लोकांची भेटीगाठी करणार आहेत .

परवा सकाळी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मूळ गावी नत्रा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर काल दिवसभर परळीत  आंदोलने झाली . वाल्मीक कराड (Walmik Karad) संदर्भात न्यायालयीन कोठडीचा निर्णय झाला .अद्याप या कोणत्याही विषयावर मंत्री धनंजय मुंडे बोललेले नाहीत .ते या प्रकरणावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ही धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत अशी शक्यता आहे . आज दिवसभर परळी शहरात ते उपस्थित असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .

धनंजय मुंडे यांची कोंडी ?

मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड यांच्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत . त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस ,मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी लावून धरले आहेत .

वाल्मीक कराड यांच्याविरुद्ध संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असल्याचे ठोस पुरावे समोर आल्याने ही मागणी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे .दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असली तरी मंत्री धनंजय मुंडे परळीत वैजनाथाचे दर्शन घेत कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत . त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here