Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये…

0
61

Sanjay Raut on Nashik & Raigad Guardian Minister : राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली. यात नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एका दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज होऊन दरे गावात निघून गेले होते, अशी चर्चा रंगली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पालकमंत्रिपदाची घोषणा करून विदेशात गेले. उदय सामंत त्यांच्याबरोबर आहेत. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी यासंदर्भात आहे. पालकमंत्रिपद हे निमित्त आहे. इतके बहुमत असलेले मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात हे आश्चर्य आहे. पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ का आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

आर्थिक देवाणघेवाण आणि हावरटपणातून मारामाऱ्या

ते पुढे म्हणाले की,  पालकमंत्रिपदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचे काम करतात. जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, तो जिल्ह्याचा असतो का? तालुक्याचा असतो का? पण पालकमंत्रिपदावरून जी दंगल सुरू आहे, ती त्या-त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी सुरू आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे. म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रिपद हवं आहे. रायगड जिल्हा सधन जिल्हा असल्याने तेथील व्यवहार सगळ्यांना माहित आहेत. तेथे अनेक उद्योग असल्याने जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील, असा तिकडे एक हिशोब नेहमी असतो. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण आणि हावरटपणातून या मारामाऱ्या सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल, लाचार मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here