WWE सुपरस्टार जॉन सीना अन् रणदीप हुडा एकत्र, हॉलिवूड ॲक्शन-थ्रीलर ‘मॅचबॉक्स’मध्ये झळकणार

0
67

Randeep Hooda and John Cena : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हॉलिवूड चित्रपटामध्ये झळकण्यास सज्ज झाला आहे. अभिनेता रणदीप हुड्डा WWE सुपरस्टार आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनासोबत एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. या दोन स्टार्सना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. सॅम हार्ग्रेव्ह दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट मॅचबॉक्स चित्रपटामध्ये जॉन सीना आणि रणदीप हुडा एकत्र काम करणार आहेत. अभिनेता रणदीप हुडा दिग्दर्शक सॅम हारग्रेव्हसोबत आगामी ॲक्शन थ्रिलर ‘मॅचबॉक्स’ चित्रपटामध्ये मोठ्या पडद्यावर परतण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन सीना देखील असणार आहे. 

WWE सुपरस्टार जॉन सीना अन् रणदीप हुडा एकत्र

2020 मध्ये आलेल्या नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटा ‘एक्सट्रॅक्शन’ (Extraction) मध्ये रणदीप हुड्डाने दिग्दर्शक हार्ग्रेव्हसोबत काम केलं होतं. यामधील त्याची साजूची त्याची भूमिका मोठ्या प्रमाणात गाजली होती. सुपरहिट नेटफ्लिक्स चित्रपट ‘एक्सट्रॅक्शन’च्या यशानंतर रणदीपचा दिग्दर्शकासोबतचा हा दुसरा हॉलिवूड चित्रपट असेल. मॅटेलच्या लोकप्रिय ‘मॅचबॉक्स’ खेळण्यांच्या वाहनांपासून प्रेरित असलेल्या या लाईव्ह-अ‍ॅक्शन चित्रपटात रणदीप हुड्डा आणि जॉन सीना यांच्यासोबतच हॉलिवूड स्टार टियोना पॅरिस, जेसिका बीएल आणि सॅम रिचर्डसन देखील दिसणार आहेत. व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, सध्या बुडापेस्टमध्ये या चित्रपटाचं प्रोडक्शन सुरू आहे.

ॲक्शन-थ्रीलर ‘मॅचबॉक्स’मध्ये झळकणार

‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ आणि ‘एक्सट्रॅक्शन 2’ चे दिग्दर्शक हारग्रेव्ह यांच्यावर मॅचबॉक्स चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. स्कायडान्सचे डेव्हिड एलिसन आणि डाना गोल्डबर्ग, मॅटेल फिल्म्सचे डॉन ग्रेंजर आणि रॉबी ब्रेनर यांच्यासह याची निर्मिती करत आहेत. डेव्हिड कॉगेशॉल आणि जोनाथन ट्रॉपर यांनी याची कथा लिहिली आहे. ‘मॅचबॉक्स’ ही बालपणीच्या मित्रांची कहाणी आहे. हे मित्र जागतिक आपत्ती रोखण्यासाठी काम करताना पुन्हा एकत्र येतात. हा चित्रपट 1953 मध्ये सुरू झालेल्या आयकॉनिक मॅचबॉक्स कार लाइनवर आधारित आहे, जेव्हा जॅक ओडेलने त्यांच्या मुलीसाठी एक खेळणी तयार केली होती, जी मॅचबॉक्समध्ये बसेल इतकी लहान होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here