Pakistan vs West Indies 2nd Test Highlights in Marathi: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यात वेस्ट इंडिजने ऐतिहासिक विजय नोंदवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. दुसऱ्या कसोटी सामन्यात जोमेल वॅरिकन आणि गुडाकेश मोती यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने विजय मिळवला. पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम या सामन्यातही सपशेल अपयशी ठरला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला होता आणि आपल्या फिरकी गोलंदाजांच्या जोरावर हा सामना जिंकेल असे वाटले होते, पण तसं होऊ शकलं नाही आणि वेस्ट इंडिजने विजय मिळवला. या सामन्यातील पाकिस्तानची ही रणनीती त्यांनाच महागात पडली. जोमेल वॅरिकनला दुसऱ्या सामन्यासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले तर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही त्यालाच पुरस्कार मिळाला. वेस्ट इंडिज संघाने ३५ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. वेस्ट इंडिजचा पाकिस्तानमध्ये शेवटचा कसोटी विजय १९९० मध्ये होता.