Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!

0
58

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात एका 17 वर्षीय मुलीने ‘मृत्यूनंतर काय होते’ हे ऑनलाइन शोधून आत्महत्या केल्याची कथित घटना घडली आहे. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, 17 वर्षीय मुलीने प्रथम ‘स्टोन ब्लेड चाकू’ने तिचे मनगट कापले आणि क्रॉस मार्क्स केले. यानंतर गळा चिरून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीतून जप्त केलेला चाकू नागपुरात नाही. त्यामुळे चाकू ऑनलाइन मागवण्यात आला असावा, असा अंदाज आहे. सायबर पोलीस मोबाईलचीही चौकशी करत आहेत.

जाणून घ्या संपूर्ण घटना..

रविवारी रात्री ही घटना घडली. सोमवारी पहाटे 5.45 वाजता मुलीची आई तिला उठवण्यासाठी खोलीत गेली असता ती बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हे पाहून आई ओरडली. आवाज ऐकून मुलीचे वडीलही खोलीत पोहोचले. यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मोबाईल जप्त केला. फोन तपासला असता ती गुगलवर ‘मृत्यू नंतर काय होते’ असे सर्च करत असल्याचे आढळले. पोलिसांना एक डायरीही सापडली आहे. मुलीला युरोपियन संस्कृतीत रस असल्याचे पोलिसांना डायरीतून समजले. तिनं आपल्या डायरीमध्ये परदेशी संस्कृतींबद्दल विपुल लेखन केले होते. काही काळ मृत्यूवर संशोधनही करत होती.

काही महिन्यांपूर्वीच हे कुटुंब नागपुरात स्थलांतरित 

मृत युवती नागपुरातील एका खासगी शाळेतील बारावीत शिकत होती. तिला 10 ते 12 परदेशी भाषाही अवगत होत्या. ती अभ्यासात खूप वेगवान होती. त्यांचे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच नागपुरात आले होते. ती आपल्या आई-वडिलांसोबत छत्रपती नगर परिसरात राहत होती आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती. वडील नागपुरात आरबीआयचे प्रादेशिक संचालक आहेत. ती तिच्या आई-वडिलांसोबत घराच्या खाली असलेल्या खोल्यांमध्ये राहत होती. त्याच्या मामाचे कुटुंब आणि आजी पहिल्या मजल्यावर राहत होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here