तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….

0
43

नागपूर : सध्याच्या काळात कामावर किंवा घरी पोहचण्यासाठी सगळ्यांना अतिघाई असते. त्यामुळे वेगाने वाहने चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात ६४ हजार वाहनचालकांनी सिग्नल तोडला तर २२ हजार वाहनचालकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केले. या अतिघाईमुळेच वर्षभरात ३४५ जण अपघातात ठार झाले असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढत आहेत. बुलेट किंवा ‘स्पोर्ट्स बाईक्स’ चालवणारे तर ‘सिग्नल’ची पर्वा न करता वाहने चालवतात. अनेक जण वेळेपूर्वी घरून न निघता केवळ उशीर होत असल्यामुळे ‘सिग्नल’ तोडून नियमांचे उल्लंघन करतात. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नसतात.

त्यामुळे ‘सिग्नल’ यंत्रणेवरून वाहतूक नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत असतात. मात्र, अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर अद्यापपर्यंत अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले नाही. चौकात पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही दुचाकीचालक बिनधास्त ‘रेड सिग्नल जम्पिंग’ करतात. वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालान पाठवण्यात येते. वाहतूक पोलिसांच्या या सर्व प्रयत्नानंतरही ‘रेड सिग्नल’ तोडणारे आणि वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण नाही. रस्ते अपघातासाठी हे दोन्ही प्रमुख कारणे असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here