Dhananjay Munde: आरोपांच्या वादळाने घेरले, बीडच्या नियोजन बैठकीनंतर धनंजय मुंडेंचा आज भगवानगडावरच मुक्काम!

0
51

Dhananjay Munde: राज्यभरात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडशी आर्थिक संबध असल्याचा आरोप होत असणाऱे धनंजय मुंडे आरोपांच्या वादळात पुरते घेरले गेले आहेत. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी अजित पवार बीडमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. अजित पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना धनंजय मुंडे हाताची घडी घालून त्यांच्या बाजूला उभे होते. आता बीडमधील जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवानगडावर (Bhagwangad) आज मुक्कामी जाणार असल्याची माहिती आहे.

धनंजय मुंडेंचा आजचा मुक्काम भगवानगडावर!

मागच्या काही काळात धनंजय मुंडे वेगवेगळ्या आरोपांच्या वादळात घेरले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अभिमन्यू नव्हे तर धनंजय आहोत. असे विधान करत कोंडी फोडली होती. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज त्यांचे उर्जास्थान असलेल्या भगवानगडावर मुक्कामी जात आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुंडे अहिल्यानगर जिल्हयात जात असून तेथून ते भगवानगडावर मुक्काम करतील. उद्या सकाळी (31 जानेवारी) ते भगवानगडावरुन परळीत परतणार आहेत. त्यापुढचे दोन दिवस ते परळीत राहणार आहेत.

अजित पवारांचे स्वागत, पदाधिकाऱ्यांनी हसतखेळत संवाद 

अजित पवार बीडमध्ये आल्यानंतर त्यांचे स्वागत करताना धनंजय मुंडे उत्साहात दिसत होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांनी हसतखेळत संवाद साधताना दिसून आले. धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी महायुती अंतर्गत दबाव वाढत आहे. दरम्यान, संकटकाळात धनंजय मुंडे अहिल्यानगरच्या भगवानगडावर मुक्काम करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा  रंगल्या आहे.

  दरम्यान, गेल्या 50 दिवसांत विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. आका वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे दररोज समोर येतायत. धनंजय मुंडेंनी दिल्ली गाठली. योगायोगानं त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते. त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार अशी चर्चा सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here