Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?

0
56

Walmik Karad Latur Property: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि दोन कोटी खंडणी घेतल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराडच्या हडेलहप्पीचे नवनवे खुलासे दररोज समोर येत आहेत . वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीपेक्षा दुसरीच्या नावाने चौपट संपत्ती असल्याचं समोर आले . वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे  साडे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती . पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यात कोट्यवधींच्या प्रॉपर्टीज ज्योती मंगल जाधवच्या नावाने असल्याचे उघड झाल्यानंतर लातूरमध्येही वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने आलिशान बंगला आणि कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याचा समोर आलं आहे . विशेष म्हणजे, संतोष देशमुख प्रकरणाला सुरुवात झाल्यानंतर या आलिशान बंगल्याचे बांधकाम थांबवण्यात आलं आहे . लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील न्यू सरस्वती कॉलनी भागात हा आलिशान बंगला असल्याचं समोर आलं आहे .

वाल्मीक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती संपत्ती ?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराडवर दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यासह हत्याप्रकरणातही संबंध असल्याचा आरोप आहे .वाल्मिक कराडच्या संपत्ती विषयीची खुलासे केल्यानंतर त्याच्या पत्नीच्या नावावर मुंबई, पुणे, सोलापूर, बीड आणि आता लातूरमध्येही कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे . वाल्मीक कराडची पहिली पत्नी मंजिरीच्या नावावर सव्वाचार कोटी रुपयांची मालमत्ता आहे .तर दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे साडे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं .दोन्ही पत्नींच्या नावे साधारण पावणे बावीस कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं आत्तापर्यंत उघड झालं आहे .

मांजरसुंब्यात 9 एकर,पुण्यात 3 ठिकाणी फ्लॅट, ऑफिस

खंडणी हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव च्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात 9 एकर जमीन आहे .फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असणारे इमारतीत दोन ऑफिस स्पेसेस आहेत .हडपसर मधील अमनोरा टाऊनशिप मध्ये आलिशान फ्लॅट,खराडी मधील गेरा ग्रीन्स विला सोसायटीत पावणेदोन कोटी रुपयांचा फ्लॅट,सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत 35 एकर जमीनआणि आता लातूरच्या सरस्वती कॉलनी मध्ये आलिशान बंगला असल्याचं समोर आलं आहे.

आलिशान बंगल्याचे काम का थांबवण्यात आले ?

संतोष देशमुख प्रकरणासह खंडणी प्रकरणाने अडचणीत आलेल्या वाल्मिक कराडने हे प्रकरण सुरू होताच दुसऱ्या पत्नीच्या नावे लातूर शहरात असणाऱ्या आलिशान बंगल्याचे काम तातडीने थांबवल्याचं समोर आलं .आमदार सुरेश धस यांच्या आरोपानंतर लातूरमधील वाल्मीक कराडच्या पत्नीच्या नावावर असलेली कोट्यवधींची प्रॉपर्टी उघड झाली .संतोष देशमुख प्रकरण राज्यभर तापलेले असताना या आलिशान बंगल्याचे बांधकाम थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here