Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता

0
57

Mumbai City District Planning Committee : उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आज (30 जानेवारी) मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार की नाहीत? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आज मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक परळीतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये दुपारी एक वाजता होणार आहे. ही बैठक पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिलीच यांची बैठक आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. 

या बैठकीला भाजप शिवसेना आणि काँग्रेस आमदार भिडण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष असेल. पालकमंत्रीपदावरून वाद असला, तरी वाद नसलेल्या ठिकाणी पालकमंत्री जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमध्ये सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीकडे सुद्धा लक्ष आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here