अपघात,१ ठार तर १ महिला गंभीर

0
64

मुर्तिजापूर :- तालुक्यातील धोत्रा फाट्या नजिक टॅक्टर ने ऑटो ला धडक दिल्याने अपघात घडलाय. या अपघातात एका ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार च्या सायंकाळी घडली.
अमरावती जिल्यातील गनोरी येथील गोपाल सुरेश पाचरे हे आपल्या परिवारा सह मूर्तिजापूर तालुक्यातील एका ठिकाणी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त देवदर्शनाकरिता गेले असता कार्यक्रम संपवून एम. एच २७ बी. डब्लू ४३७५ क्रमांकाच्या ऑटोने गनोरी येथे परतीच्या मार्गाने पिंजर ते मूर्तिजापूर रोड ने जात असतांना धोत्रा शिंदे फाटा नजिक ऑटो ला अज्ञात ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने ऑटोतील प्रवाशी गोपाल सुरेश पाचरे ३५ वर्ष हे ऑटोतून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचा चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला तर छाया निलेश पाचरे वय ४० रा गनोरी ता. भातकुली जि. अमरावती ह्या गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघांचे आमदार हरिष पिंपळे यांनी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे धाव घेऊन मृतक व जखमींच्या नातेवाईकांना धीर देत गंभीर जखमी महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचार करुन त्यांना रात्रीच्या वेळी पाणी, चाय, बिस्कीट ची व्यवस्था व आर्थिक मदत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here