राहुल गांधी यांनी तोडले अकलेचे तारे, शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली

0
28

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीका त्यांच्यावर केली आहे. तसेच भाजपने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आपल्या अकलेचे तारे तोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी नवीनच वादात अडकले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी भाजपने राहुल गांधी यांना माफी मागण्याची मागणी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

भाजपकडून कायदेशीर कारवाईचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे. त्यानंतर भाजपने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली देतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादार व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असे भाजपने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here