श्री गाडगे महाराज वृद्धाश्रम वलगाव, गोकुळ आश्रम अमरावती व समर्पण बहुउद्देशीय संस्था कोंडेश्वर येथे ई. सी .ई. इंडिया फाऊंडेशनच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करून श्री छत्रपती शिवाजी महाराज ३९४ वी जयंती साजरी करण्यात आली .
ई. सी. ई. इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातात . वर्षभर महापुरुष्याच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रमी साजरे केले जातात .विद्यार्थांसाठी प्रेरणादायी व्याख्यान ,रोजगार कार्यशाळा ,रक्तदान शिबीर ,शालेयपयोगी साहित्य वाटप असे उपक्रम राबविले जाते त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज ३९४ व्या जयंती निमित्त श्री गाडगे महाराज वृद्धाश्रम वलगाव येथे गहू ४० किलो, तांदूळ ४७ किलो ,साखर१० किलो , खाद्यतेल १५ किलो ,कणीक ५ किलो ,तूर डाळ १ किलो, वापरण्यायोग्य कापड, व छत्रपती शिवाजी महाराज फोटो फ्रेम देण्यात आली.
याप्रसंगी संस्थेतील वृद्ध व्यक्तीना मिठाई वाटप करण्यात आले. त्यासोबतच अमरावती येथील गोकुळ आश्रम येथील अनाथ, गरजू विध्यार्थी याच्यासाठी काम करणारी संस्था व समर्पण बहुउद्देशीय संस्था कोंडेश्वर वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण देणारी संस्था या संस्थेमध्ये जाऊन चॉकलेट ,बिस्कीट विद्यार्थांना देण्यात आले.वीटभट्टी येथे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी वापरण्यायोग्य उपयोगी कापड देण्यात आले.
श्री गाडगे महाराज वृद्धाश्रम वलगाव पदाधिकारी आराध्या बोरसे , गोकुळ आश्रम संस्थेच्या संचालिका गुंजन ताई गोळे ,समर्पण बहुउद्देशीय संस्था कोंडेश्वर संस्थेच्या संचालिका शोभाताई तायडे यांनी आभार मानले.
ई. सी. ई. इंडिया फाऊंडेशन पर्यावरण ,रोजगार ,आरोग्य ,शिक्षण ,निवारा या पाच क्षेत्रामध्ये कार्य करत आहे . आपणही काही समाजाचे देणे लागते हि भावना ई. सी . ई. इंडिया एनर्जीस प्रा. ली. येथील सहकारी यांनी असा विचार व कृती करून समाजउपयोगी उपक्रम राबविण्यासाठी साहित्य जमा करून मोलाचे योगदान दिले. श्री समीर काळे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अमित आरोकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.