गुरुसिद्धी संगीत विद्यालय तिवसा येथील तीन विद्यार्थी तबला विशारद पूर्ण….

0
43

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई, अंतर्गत होणाऱ्या परीक्षा म्हणजे 1.प्रारंभिक 2.प्रवेशिका प्रथम 3.प्रवेशिका पूर्ण 4.मध्यमा प्रथम 5.मध्यमा पूर्ण 6.विशारद प्रथम 7. विशारद पूर्ण. अश्या प्रकारे सात वर्षांच्या कालावधीत हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी यांनी आपल्या गुरूबद्दल आदर, एकनिष्ठता, श्रद्धा,कायम ठेवून प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंत तबला विषयाचे शिक्षण गुरुसिद्धी संगीत विद्यालय तिवसा येथील प्रमुख मार्गदर्शक प्रा.सुनिल इंगोले यांच्या कडून घेतले असून आज विशारद ही पदवी प्राप्त केली….

त्यात प्रणव कुबडे वाठोडा (खुर्द) ता . तिवसा येथील रहिवासी असून यांच्या कुटुंबात संगीताचा कुठलाही गंध नसताना त्यांनी तबला विशारद पूर्ण ही पदवी मिळवली व आपल्या गावाचे नावलौकिक केले. व उच्च शिक्षण घेण्याकरिता त्यांच्या मनाची तयारी असून ते मुंबई येथे जाण्याच्या तयारीत आहे त्याच बरोबर रोहित कडू हे एक गुरुदेव भक्त. लहान पणापासून वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ध्यान व प्रार्थना या वातावरणात राहून संगीत शिकण्याची इच्छा प्रगट झाली व गावातील भजनात एक तबला वादक पाहून व ऐकूण ग्रामीण भागातील नामवंत तबला वादक श्री. दिनकर राऊत यांच्या जवळ आपली तबला शिकण्यासाठी ईच्छा प्रगट केली त्यांनी रोणीत कडू यांना गुरुसिद्धी संगीत विद्यालय तिवसा येथे स्वतः आणून प्रा. सुनिल इंगोले यांची ओळख पटवून दिली..

प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंत तबला विषयाचे मार्गदन प्रा. सुनिल इंगोले यांचे कडे घेतले व विशारद पूर्ण (तबला) ही पदवी मिळवली . त्यांच्या गावातील विशारद ही पदवी प्राप्त करणारे हे एकमेव व्यक्ती असल्या कारणाने त्यांचे सर्व गावकरी कौतुक करित आहे. आणि धार्मिक इंगोले यांचे कुटुंब पिठ्यान पिठ्या पासून संगीतचां वारसा जपणारे मुळ रहिवासी धोत्रा (माणिक ग्राम ) वडिला पासून कवठाळ ता . मोर्शी येथून सध्या परिस्थितीत सुरवाडी ( बुजरूक ) तिवसा येथे रहिवासी असून यांना तबला शिकण्याकरीता प्रोत्साहीत करणारे नितीन कुबडे लहान पणी नकळत घरी भजन असतांना तबल्यावर बोट टाकले त्यावेळी नितीनभाऊ यांनी धार्मिक तु तबला चांगला वाजवशिल. तु तबला शिक . एवढ्या बोलण्यावरून धार्मिकने आपले आजोबा संगीत विद्यालयाचे संस्थापक श्री. बलदेवराव इंगोले व वडील प्रा. सुनिल इंगोले यांच्या कडून तबल्याचे शिक्षण घेतले व विशारद पूर्ण ( तबला ) ही पदवी प्राप्त केली अश्या प्रकारे तिनही तबला कलाकारांना पुढील भविष्याच्या उज्वल यशा करीता शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here