भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 अन्वये जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारात अन्न वस्त्र निवारा चा अधिकार अंतर्भूत केला आहे. राज्यघटना अनुच्छेद 12 अन्वये राज्याच्या अर्त्यारीत मूर्तिजापूर SDO नी प्रयोजन करता सरकारी E क्लास व F क्लास जमिनीवरील कायम स्वरुपी असलेले गोर गरीब लोकांचे अतिक्रमण जमीन महसूल कायदा 1966 चे कलम 51 च्या तरतुदी नुसार नियमकुल करावे अतिक्रमण धारकांना 8 अ देवून मालकी हक्क प्रदान करावे अन्यथा या पुढे अतिक्रमण धरकांचे करो या मरो आंदोलन छेडले जाईल असा इशारा समाज क्रांती आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज शेंडे यांनी SDO कार्यालय समोर अतिक्रमण धारकांना बोलताना दिला.
शेंडे पुढे म्हणाले की प्रशासन राजकीय दबावाखाली येऊन श्रीमंत भांडवलदार व राजकारणी लोकांना कलम 51 च्या आधारे सरकारी जमिनीचे मालक बनवतात मात्र हातगाव येथील गोर गरीब जनतेचे 30 ते 40 वर्ष पासून कायम स्वरुपी असलेले अतिक्रमण नियमाकुल करण्यास टाळाटाळ करते समाज क्रांती आघाडीच्या जिल्हा संघटक मा. सुदामभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 2019 ला आमरण उपोषण केले नंतर 4 ऑक्टोंबर 2019 ला मोर्चा काढण्यात आला आणि नंतर पुन्हा 15/08/2024 ला आमरण उपोषण केले 25 मंजूर प्रस्ताव ऑनलाईन असून सुद्धा शासनाने दखल घेतली नाही 2016 पासून या अतिक्रमण धारकांची नीयमकुल ची मागणी असून दाखल घेण्यात आली नाही, तरी शासनाने लवकर दाखल घ्यावी अन्यथा करो या मरो आंदोलन छेडण्यात येणार आहे या प्रसंगी समाज क्रांती आघाडी चे जिल्हा संघटक मा. सुदामभाऊ शेंडे , निरंजन गवई, धममनंद तायडे, अजाबराव दामले, बंडू डोंगरे, नंदू नानिर, विनोद इंगळे, सतीश इंगळे, धनराज सावंत, राजू अंभोरे, दिवाकर इंगळे, प्रवीण चाहकर, दादाराव सरदार, प्रकाश जमनिक, चंद्रभान घने, प्रकाश कोलखेडे, मंगेश इंगळे, देवधन दामोधर, उमेश सावडे, प्रेमदास समदुरे, वनमाला शेंडे, शालुबई खंडारे, विशाखा जामनिक, उशाबाई किर्दक, मंजू ढोके, नीलिमा चहाकर, अल्का हरणे, लक्ष्मी भालेराव, विद्या बनकर, सुनंदा ननिर, रुपाली वानखेडे, सुकेशनी खंडारे, सुमन खांडेकर, अर्चना वानखेडे, आम्रपाली वानखेडे, प्राची खंडारे, अनिता दामले, वैशाली सिरसाठ, सुरेखा सावंत, पवित्रा खंडारे,सत्यभामा इंगळे,सागर बरडे निवेदन देते वेळी असंख्य अतिक्रमण धारक उपस्थित होते.