अमरावती, प्रतिनिधी दि. ३: राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आज अमरावतीमधील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी तहसीलदार अश्विनी जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर मंत्री राणे हे मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना झाले.

