मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील लक्षेश्वर संस्थांच्या वतीने शिवभक्त व कावळ त्सवानिमित्त अमरावती व अकोला जिल्ह्यातील कावळ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हरीश भाऊ पिंपळे हे होते. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदीप आपार, दर्यापूरचे ठाणेदार वानखडे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, शहर पोलीस स्टेशन ठाणेदार अजित जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग नवलकर, पत्रकार मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ दहापुते, यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व आपले मनोगत व्यक्त केले, यावर्षी डीजेवर बंदी असल्यामुळे पारंपारिक वाद्यांना, सांप्रदायिक मंडळांना, ढोल ताशे, यांना कावळ मंडळांनी आपल्या मिरवणुकीत वापर करावा असे आव्हान आमदार हरीश पिंपळे यांनी मंडळातील कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कावळ उत्सव हा हिंदू संस्कृती मोठा उत्सव म्हणून उदयाला आलाय आहे. कावड उत्सवाला कुठे गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे , तसेच पूर्णा घाटावर लाईट व आपत्कालीन पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. .

