मूर्तीजापूर भाजप गटातील ‘विश्वासघाताचा साप: मित्रांची फसवणूक करून नेत्याची चापलुसी”

0
60

मूर्तीजापूर भाजपच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ गाजली आहे. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते मोठे झाले, त्याच नेत्याबद्दल त्यांच्या काही निकटवर्तीय मित्रांनी नकारात्मक चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेतील आणखी एक कटु सत्य उघड झाले आहे.


या गटातील एका महत्त्वाकांक्षी सदस्याने, मित्रांसोबतच्या चर्चेचे कॉल रेकॉर्डिंग करून किंवा त्यांची फसवणूक करून ही माहिती नेत्यापर्यंत पोहोचवल्याचे समजते. हा सदस्य नेत्याचा विश्वास संपादन करून आपल्या मित्रांचाच गेम करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. या कृत्यामुळे, याने फक्त नेत्याचाच नाही, तर आपल्या मित्रांचाही विश्वासघात केला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत नेत्याच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ‘नेत्यांचे निर्णय आता कालबाह्य झाले आहेत,’ असे विधानही या चर्चेत झाल्याचे समजते. पण या चर्चेची माहिती नेत्यापर्यंत पोहोचवणारा हा व्यक्ती निष्ठावंत नसून, आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राजकीय वर्तुळात या प्रकारामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या व्यक्तीने विश्वासघात केला, तो आता नेत्याच्या जवळ जाऊन आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे भविष्यात भाजपच्या या गटात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नेत्यांसमोर आपल्या विश्वासू आणि संधीसाधू कार्यकर्त्यांमधील फरक ओळखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here