
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मुर्तीजापुर यांनी माना येथील तक्रारकर्ते उद्धव कोकणे यांनी कोणतेही प्रकारचे कार्यालयात अपील न करता कार्यालयात विनाकारण त्रास देऊनदोन ते तीन महिने केस चालवून अपील अमान्य केल्याचा लेखी आदेश दिला. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी उपअधीक्षक विवेक बिहाडे भूमी अभिलेख मूर्तिजापूर, यांच्या विरोधात दिनांक 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण व आत्मदहण्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे. सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, माना येथील सीट नंबर पाच व प्लॉट नंबर 46 व 50 च्या दिनांक 24/ 4 /2023 रोजी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक अकोला यांच्या न्यायालयाने उद्धव कोकणे व आनंदराव कोकणे, यांच्या जुन्या झालेल्या नझुल चुकीमुळे जुनी चौकशी पणजी व इतर जुने कागदपत्रे हे रद्द केले. व त्याची नोंद घेण्यास मूर्तिजापूर उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना आदेश दिला. त्याचप्रमाणे वरील आदेश हा माननीय उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती यांनी सुद्धा चुकीची दुरुस्ती करण्याचा उपअधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आदेश दिला, परंतु उपअधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूरचे विवेक बिहाडे यांनी विरोधकांशी संगणमत करून आर्थिक देवाणघेवाण करून तक्रार करते उद्धव कोकणे यांनी कोणत्याही प्रकारचे भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे अपील न करता, व उपअधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालविण्याचे अधिकार सुद्धा नसताना, तक्रार करते उद्धव कोकणे यांना विनाकारण त्रास देऊन अपील केले नसताना सुद्धा त्यांचे अपील हे निकाली काढून व दोन ते तीन महिने कार्यालयात केस चालवून अपील न करतांना सुद्धा त्यांचे अपील हे अमान्य करण्यात आले. उपविभागीय दंडाधिकारी मूर्तिजापूर, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अकोला, उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती, या तीनही वरिष्ठांचे आदेश उपअधीक्षक विवेक बिहाडे यांनी आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांच्या विरुद्ध गैरअर्जदारांशी संगणमत करून आर्थिक देवाण-घेवाण करून चुकीचे आदेश देऊन, तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख मुर्तीजापुर यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करून त्यांच्या आदेशाला ही केराची टोपली दाखविली. त्यामुळे उपअधीक्षक मूर्तिजापूर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर, व चुकीचा आदेश देऊन फसवणूक केल्याची तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी. व त्यांनी दिलेले चुकीचे आदेश हे रद्द करून अकोलाअधीक्षक भूमी अभिलेख अकोला, व उपसंचालक अमरावती प्रदेश अमरावती, यांच्या आदेशाचे पालन व्हावे. व जुन्या झालेल्या नजुल चुका ह्या दुरुस्त करण्यात याव्या. व प्रत्यक्ष ताबा वहीवाटेप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालय मुर्तीजापुर येथे नोंद व्हावी. या मागण्यांसाठी दिनांक 15 ऑगस्ट 2025 पासून मुर्तीजापुर भूमी अभिलेख कार्यालयासमोर तक्रार करते उद्धव कोकणे हे आमरण व आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला. चौकट…… (१)मी अपील न करता विवेक बिहाडे भूमी अभिलेख उपाधीक्षक मुर्तीजापुर यांनी विरोधकांशी संगणमत करून व आर्थिक देवाण-घेवाण करून माझे अपील अमान्य केले. उपअधीक्षक मुर्तीजापुर विवेक बिहाडे हे एवढे पैशाची देवाणघेवाण करण्यास मग्न झाले होते की त्यांना हे सुद्धा सुचले नाही की मला अपील घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. उपअधीक्षकांनी दिलेला आदेश हा तातडीने रद्द करून त्यांच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. व प्रत्यक्षात ताबा वही वाटेप्रमाणे अखीव पत्रिका देण्यात याव्या. उपोषणादरम्यान माझ्या जीवितवास काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार उपअधीक्षक मूर्तिजापूर विवेक बिहाडे व या संबंधित प्रशासन हे राहतील.(२) उपाधीक्षक मूर्तिजापूर विवेक बिहाडे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचे पालन केले नाही. व माननीय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अकोला यांच्या आदेशाचे सुद्धा पालन केले नाही. तसेच माननीय उपसंचालक अमरावती प्रदेश अमरावती यांच्या सुद्धा आदेशाचे पालन केले नाही.(३) विरोधकांकडून आर्थिक देवाण-घेवाण करून उपअधीक्षक मूर्तिजापूर यांनी दिला चुकीचा आदेश.(४) उपअधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालविण्याचा अधिकार नसताना सुद्धा दोन ते तीन महिने कार्यालयात केस चालवून तक्रारकर्त्यांना नाहक त्रास देऊन अपील अमान्य करण्याचा लेखी आदेश दिला . त्यांच्यावर कारवाईची मागणी.
