मुर्तीजापुर शहरात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते आपल्या कामाने आपली ओळख निर्माण करतात तसेच समाजकार्यातून राजकारणाकडे जाणारा वर्ग हा फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्येच एक नाव सदैव पुढे येत असलेलं आपण या दिवसांमध्ये पाहत आहे ते म्हणजे सुनील पवार ज्यांना कोणताच राजकीय सामाजिक पाठबळ नसताना स्वतःच्या कर्तुत्वाने कार्याने व कर्माने लोकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा व कोणाच्याही मदतीला धावून जाणारा समाज उपयोगी काम करणारा नगरसेवक दशेमध्ये नसताना सुद्धा ग्रामीण रुग्णालयात गोरगरिबांची आरोग्यविषयक रक्तदाना विषयक सेवा करीत कोणत्याच पक्षांमध्ये नसतांना अपक्ष नगरसेवक निवडून आल्यावर त्याच्या कामाची जशी गती मोठ्या प्रमाणात वाढली व निवडून आल्यानंतर बरेचशे पदाधिकारी हे अतिशय आरामाचा श्वास घेतात त्यातच आपली गती वाढवून काम करणारा कामाची धडपड दाखविणारा व कामामध्ये सातत्यपूर्ण कार्य करणारा म्हणजेच सुनील महादेवराव पवार गत मागील चार वर्षापासून प्रभाग क्रमांक 11 व सध्या नव्याने प्रभाग रचनेतील झालेला प्रभाग क्रमांक 12 मध्ये विद्यमान नगरसेवक नसतांना सुद्धा मागील चार वर्षापासून एकएक व्यक्तीच्या समस्या काळजीने समस्या ऐकत फार जिक्रीने त्या समस्यावर व्यक्तीच्या काम करून तात्काळ पूर्ण करत, प्रत्येक कामावर आपला वेळ देऊन ते काम नगरसेवकाच्या अत्यारीत येत असो वा नसो काम पूर्ण करून द्यायचा, सुनील पवार चा कामाचा अनुभव आणि मानस सदैव जनतेने अनुभवलेला आहे. अशातच अचानक आज एका जागी अतिशय बिकट जटील समस्येला वाचा फोडत असताना तिडके नगर मधील चोकअप झालेली नाली व काही लोकांची चोकअप आउटलेट दुरुस्त करण्यासाठी बाहेरून कामगार मजूर वर्ग बोलावून त्या कामाला पूर्ण करताना चे काही दृश्य आज टिपल्या गेले आहे तसेच काही लोकांशी संवाद साधला असता, ही कामे सुनील पवार नियमित करतात व त्यांच्या कोणत्याच कामांमध्ये खंड नसल्याचे आजपर्यंत पाहायला मिळत आहे. असा गावाला भेटलेला अपक्ष नगरसेवक खरोखरच गावाचा दूरदृष्टी ठेवणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या नजरेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या दिवसात निवडणुका येतच आहे त्यामध्ये जनतेने अशा प्रतिनिधीची निवड करून त्यांना भरगच्च मतांनी निवडून देऊन त्यांना समाज उपयोगी कामाकरिता पुढे करावे असे बऱ्याच जनतेचे म्हणणे आज इथं ऐकायला मिळाले आहे.