
मुर्तीजापुर | विशेष प्रतिनिधीज्वालादीप न्यूजने उघड केलेल्या धक्कादायक बातमीनंतर अखेर प्रशासन आणि पोलीस विभाग हालचालीत आले आहेत. शहरात बिनधास्त सुरू असलेली MRP पेक्षा जास्त दराने दारू विक्री, विना परवाना बार आणि पानठेले यांची अवैध मद्यविक्री यावर आता लक्ष ठेवण्यात येत आहे.शहरातील काही बार आणि वाईन शॉपींवर पोलिसांनी तपासणी केली असून, अनियमितता आढळलेल्या ठिकाणी कठोर कारवाई सुरू झाली आहे. काही पानठेले हटवण्यात आले असून, शहरातील असंख्य नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे.पोलीस आणि महसूल विभागांची संयुक्त मोहीमपोलिसांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून बार, शॉपी आणि ठेल्यांची चौकशी सुरू झाली आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महसूल आणि नगरपालिका विभागालाही पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.ज्वालादीप न्यूजचा परिणाम – जनतेचा आवाज पोहोचला सरकारपर्यंतजर मीडिया जबाबदारीने आवाज उचलला, तर परिवर्तन शक्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ज्वालादीप न्यूजच्या सत्य आणि धाडसी वृत्तांकनामुळेच प्रशासनाला कृती करावी लागली, असा सूर शहरातील जनतेतून व्यक्त होत आहे.नागरिकांचा सहभाग महत्त्वाचाप्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे की, कोणतीही अनियमितता, जास्त दराची विक्री, विना परवाना मद्यविक्री, पानठेल्यांवर होणारी दारू विक्री आढळल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना किंवा अधिकृत हेल्पलाईनवर माहिती द्यावी.मुर्तीजापुरचा निर्धार – आता गप्प बसणार नाहीहे फक्त सुरुवात आहे – जर पुन्हा दुर्लक्ष झालं, तर जनतेचं आंदोलन निश्चित आहे, असा इशारा आता नागरिक देत आहेत. मुर्तीजापुर भ्रष्टाचार, फसवणूक आणि अवैध धंद्याविरुद्ध एकवटतोय. ज्वालादीप न्यूज जनतेसोबत आहे.