
मूर्तिजापूर ६ ऑगस्ट, २०२५ रोजी जयस्तंभ चौकात हा विशेष स्टॉल लावण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या या राख्यांचे सर्वत्र कौतुक झाले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक शासकीय, निमशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांमध्ये प्रभारी तहसीलदार राऊत साहेब, नायब तहसीलदार नागोलकर साहेब, चाणक्य अकादमीचे संचालक कुलदीप वाकोडे, नुपेन बाबूभाईजी पटेल, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब कांबे, दिलीप अहिरवार आणि नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष अनिल डाहेलकर यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि आभार मानले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.