
मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान ला जिल्हाधिकारी अकोला अजित कुंभार यांनी भेट दिली. त्यांनी कावड यात्रा निमित्त मुख्य रस्त्याची पाहणी व घाट व मंदिरातील झालेल्या बांधकांमाची पाहणी केली .येणा-या कावळयात्रे प्रशासनाकडुन उपाययोजना करण्यात याव्या जेणे करुन भावी भक्तांना सोई सुविधा उपलब्ध होईल आमदार हरिष पिपळे यांनी जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांचे वेधले लक्ष, मान्यवरांच्या वतीने सर्व प्रथम लक्षेश्वर महाराजाचे दर्शन घेण्यात आले .कावड उत्सव मंडळाचे अध्यक्ष मुर्तिजापुर चे आमदार हरीष पिंपळे यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे पुष्पगुच्छ व लक्षेश्वर भगवान यांची प्रतिमा देऊन स्वागत केले , तसेच आमदार हरीश पिंपळे यांचे स्वागत सरपंच राजप्रसाद कैथवास यांनी केले. तहसीलदार शिल्पा बोबडे यांचे स्वागत संस्थांच्या वतीने तुळशिराम वरणकार यांनी केले. यावेळी जि.प. कार्यकारी अभियंता प्रकाश इंगळे , उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चे राजेश नवलकर, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुर्तिजापूर उप अभियंता अनिता भगत , साहाय्य अभियंता श्रेणी-२ निशीगंधा जवंजाळ , शाखा अभियंता जि.प .अकोला प्रशांत लोखंडे, गटविकास अधिकारी मिलींद मोरे , विस्तार अधिकारी विजय किर्तेने , मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव , ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव , सरपंच रामप्रसाद कैथवास , ग्राम महसुल अधिकारी विरेंद्र वानखडे , राहुल सोनकुसरे ,मंडळ अधिकारी रविंद्र पुरी , तंटामुक्तीचे अध्यक्ष नजाकत पटेल , पोलिस प्रशासन, संस्थांचे पदाधिकारी , कार्यकर्ते , विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते , गावातील ग्रामस्थ उपस्थित
