
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात खदान स्मशानभूमी येते परिसरातील स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वच्छ मूर्तिजापूर’ या ध्येयाने प्रेरित होऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तिवारी सर, द्वारकाप्रसाद दुबे, कैलास महाजन, विलास वानखडे, खंडारे, सुनील भोजगडिया, अग्रवाल यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ केला आणि झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला.
