*१९ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान दौऱ्याचे नियोजन

अमरावती, दि. ९ : अनुसूचित जमाती कल्याण समिती ही दि. १९ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये प्रशासकीय बाबींसह विविध शासकीय कार्यालयांमधील अनुसूचित जमातीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे. दौऱ्यानुसार मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता समितीचे सदस्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे एकत्र जमणार आहेत. सकाळी ९.३० ते १० दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या समवेत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच अडचणीबाबत चर्चा करतील. त्यानंतर सकाळी १० ते ११ यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद येथील अनुसूचित जमातीच्या अधिकारी, कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत पोलीस आयुक्त (शहर) आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या कार्यालयातील संबंधित बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अमरावती कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. दुपारी १२.३० ते १ या वेळेत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, अमरावती येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल. दुपारी १ ते १.३० या वेळेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. दुपारी १.३० ते २.३० पर्यंत राखीव राहील. त्यानंतर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चर्चा करतील. जिल्हा परिषद अमरावती येथे दुपारी ३.३० ते ५ दरम्यान जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसोबत समवेत चर्चा करतील. तसेच सायंकाळी ५ ते ६:३० दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी यांच्या अधिकाऱ्यांसोबत अनुसूचित जमातीच्या कल्याणकारी योजना आणि इतर बाबींवर चर्चा होईल. त्यानंतर समिती ही शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम करेल.बुधवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत समिती जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहांना भेट देईल. तसेच जिल्हा परिषद यंत्रणाकडून राबविण्यात आलेल्या कामांना भेटी देतील. त्यानंतर समिती शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथे मुक्काम करेल. गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समिती चिखलदऱ्याहून अमरावतीकडे प्रयाण करेल. त्यानंतर अमरावती महापालिकेत सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत महानगरपालिका आस्थापना आणि शिक्षण विभाग, महानगरपालिका अमरावती येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. दुपारी १२.३० ते ३ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दौऱ्यात शासकीय कामकाजाबाबत आढळलेल्या त्रुटी आणि कार्यवाहीबाबत चर्चा केली जाईल. समितीमध्ये समितीचे प्रमुख दौलत दरोडा आहेत. सदस्यांमध्ये हरिशचंद्र भोये, डॉ. मिलिंद नरोटे, केवलराम काळे, राजू तोडसाम, राजेश पाडवी, शांताराम मोरे, मंजुळा गावित, हिरामण खोसकर, आदित्य ठाकरे, रामदास मसराम, उमा खापरे, इद्रिस नायकवडी, राजेश राठोड, सुनिल शिंदे आणि निमंत्रित सदस्य विनोद निकोले यांचा समावेश आहे.