मुर्तिजापूर: इंदिरा गांधी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा शुभारंभ, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण

0
17

मुर्तिजापूर: येथील इंदिरा गांधी नगर परिषद प्राथमिक विद्यालयात मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५ रोजी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासोबतच पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
या योजनेच्या नव्याने अध्यक्षपदी निवड झालेले आणि माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांनी केवळ या उपक्रमाचे नेतृत्व केले नाही, तर आपल्या स्वखर्चाने शाळेच्या परिसरात झाडे लावून सामाजिक कार्याबद्दलची आपली बांधिलकी दाखवून दिली. त्यांच्या या दुहेरी कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि पर्यावरणाच्या संरक्षणाला प्रोत्साहन मिळाले आहे.

या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात कैलाश महाजन, इब्राहिम भाई घाणीवाले, संजय गुप्ता, सुभाष भाऊ देशमुख, अजबराव वहिले, चंदन शेठ अग्रवाल, गजानन दुरतकर, गणेश जळमकर यांचा समावेश होता. या मान्यवरांनी द्वारकाप्रसाद दुबे यांच्या या उदात्त कार्याचे विशेष कौतुक केले.

यावेळी हेमंत सर, शालिनी मॅडम, सुजल, जोडपे सर,व इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे प्राध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. द्वारकाप्रसाद दुबे यांच्या पुढाकारामुळे आणि योगदानामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी एक नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या शैक्षणिक विकासाला मोठी मदत होणार आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजाला एक चांगला संदेश मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here