कृषी विभागातर्फे शाश्वत दिन साजरा

0
14

अमरावती, दि. 13 (जिमाका) : कृषी विभागातर्फे भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत दिन म्हणून साजरा करण्यात आला. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर लांडे, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, प्रा. जितेंद्र दुर्गे, विषय तज्‍ज्ञ अमर तायडे, घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे निखील टेटू, कृषी उपसंचालक वरूण देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात अनिरुद्ध पाटील यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. तसेच हवामान बदल, अन्नसुरक्षा आणि कृषी क्षेत्रातील उपक्रमासाठी जनजागृती करणे, तरुणांमध्ये कृषी क्षेत्राबद्दल उत्सुकता आणि सहभाग वाढविणे, शेतकरी संशोधक विद्यार्थी व कृषी उद्योजक यांच्यात समन्वय साधण्याबाबत मार्गदर्शन केले.

प्रयोगशील शेतकरी निखिल तेटु यांनी, नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीमधील रानभाज्या, तरुणांमध्ये शाश्वत शेतीविषयी जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी पवनकुमार ढोमने यांनी सूत्रसंचालन केले. आत्मा कृषी उपसंचालक विवेक टेकाडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here