
मूर्तिजापूर: शहरालगतच्या प्रतिकनगर परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या या २२ वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित मुलगी मूर्तिजापूर येथील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. रक्षाबंधनाचा सण साजरा करून ती आपल्या खोलीवर परतल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मोबाईल बंद असल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता, मुलीला पळवून नेल्याचे त्यांना समजले.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी तात्काळ मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय दंड विधान संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक नितीन राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.