मुर्तिजापूर शहरात वाहतूक कोंडी : नागरिकांची डोकेदुखी वाढली, वाहतूक पोलीस निष्क्रिय

0
19

मुर्तिजापूर: मुर्तिजापूर शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे आणि या समस्येवर तोडगा काढण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये आणि बस स्टँड परिसरात रोजच्या रोज वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विशेषतः शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बस स्टँड परिसर येथे परिस्थिती जास्त गंभीर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने बेशिस्त वाहनचालकांना कोणाचेही भय राहिलेले नाही. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर कुठेही उभी केली जातात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आणि इतर वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे

अवैध पार्किंग आणि अस्ताव्यस्त वाहनांमुळे रहदारीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो. या प्रकारांमुळे अनेक अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते वाहतूक पोलीस याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कठोर पावले उचलणे, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे आणि वाहतूक पोलिसांना अधिक सक्रिय करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, ही समस्या दिवसेंदिवस वाढतच जाईल आणि नागरिकांची डोकेदुखी अधिक वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here