
मुर्तीजापुर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुर्तीजापुर, लाखपुरी, हातगाव, निंबा, जामठी, कुरूम, माना, शेलु बाजार महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे कापूस, तूर,उडीद,मूग, सोयाबीन भाजीपाला, फळ पिके त्यांचे ९०% पर्यंत नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे उन्हाळा पासून केलेले श्रम मातीमोल झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी हा जीएसटी भरून देशाच्या सकल उत्पन्नात भर घालत असतो.
शेती हा सतत तोट्यात चालणारा धंदा झाला असून तो याही वर्षी तोट्यात जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. उत्पादन खर्चानुसार मिळत नसलेला बाजारभाव, नैसर्गिक संकटे, वाढलेला उत्पादन खर्च, वन्य प्राण्यांचा त्रास, मिळत नसलेला पिक विमा यामुळे मेटाकुतीस आलेल्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकट अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व पिक विमा देण्याची विनंती आज मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन मा.तहसीलदार मूर्तिजापूर यांच्या मार्फत मूर्तिजापूर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी पाठविले असून माननीय मुख्यमंत्र्यांना या संकटाची जाणीव करून देऊन त्वरित अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्याची विनंती प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूरचे अध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी राजूभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे,जनमंचचे सुधाकर गौरखेडे, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुपचे मुन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानिया, राजू पाटील जोगदंड, अनंत शेटे ,प्रीतम देशमुख, दिगंबर जाधव, अक्षय देशमुख ,अनिल देवगिरकर, प्रशांत कडू, डॉक्टर वडुरकर, प्रफुल्ल मालधूरे,जगदीश जोगळे,संजय जायले,प्रमोद खेडकर,अजय गोरले,मनीष मुंदडा,दिगंबर टाले,शिव कांबे,मिलिंद वानखडे, विनोद पखाले, अमोल बोंडे, दीपक डहाके,चंदू वानखडे,अरुण बोंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
