

मूर्तिजापूर: नागपूर-बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर आज एक मोठा अपघात घडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एका बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मूर्तिजापूर येथील व्यास हॉटेलसमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याहून नागपूरकडे जाणारी बस (एमएच २० जीसी २५९४) रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच ३० एजे ८२३९) धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या मुर्तीजापुर लक्ष्मीबाई देशमुख जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णालयात दाखल केले

दोन्ही युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पूर्ववत केली.
या प्रकरणाचा पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस करत आहेत, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.