मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी; शेतीचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी*

0
14

मूर्तिजापूर: मूर्तिजापूर तालुक्यात १८ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.या निवेदनात, शिवसेना तालुका प्रमुख गजानन सदाशिवराव चौधरी आणि शहर प्रमुख विनायक भाऊ गुल्हाने यांनी म्हटले आहे की, “अचानक आलेल्या पुराने आणि शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी सरकारने तात्काळ पंचनामे करून त्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी.यावेळी, पक्षाने ‘ई-पीक पाहणी’ ॲपचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होत नाही, ही समस्याही निवेदनातून मांडली.हे निवेदन सादर करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात चंदू भाऊ तिवारी, अरविंद तायडे, अमोलभाऊ तांबडे, सागर रामेकर, रेखाताई कराड,शोभाताई चव्हाण (कानडी),सचिनभाऊ तांबडे,उपतालुका प्रमुख तथा सरपंच,अमर पाटील ठाकरे,विलासराव देशमुखबाळासाहेब खांडेकर,मनोज भाऊ गायकवाड,अभिषेक पोलकट,फिरोजभाई चाऊस,बाळूपाटील,राऊतराजूभाऊ म्हसाये,विकास भाऊ लकडेसंतोषभाऊ रुद्रकार अण्णासाहेब कावरे प्रवीण बिलेवार आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश होता. या वेळी, तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. या घटनेमुळे तालुक्यात शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here