
मूर्तीजापूर (प्रतिनिधी): श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी मूर्तीजापूर शहरात आयोजित कावड महोत्सवात अमोल लोकरे मित्र परिवाराच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरात शिवभक्तांसाठी दोन क्विंटल साबुदाणा वडे आणि उसळ वाटप करण्यात आली.
या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यात लोकरे मित्र परिवाराकडून शिवभक्तांसाठी अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच परंपरेनुसार, यंदाही कावड महोत्सवात सहभागी झालेल्या भाविकांसाठी विशेष महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अमोल लोकरे यांच्यासह अशोक कोळवले, दिलीप येडावकर, कैलास तिवारी, मुरली मारवे, राजूभाऊ जळमकर, शरद अण्णा गुंजाळ, शाम पाचाडे, विकी कोळवले, नेताजी राजे, सोपीनाथ येदवर, भास्कर बोरे, राजू आजळकर, इब्राहिम भाई, अनिल जाधव, संजय जाधव, अनिल लिंगाळे, आनंद अरोरा, पत्रकार विलास सावळे आणि अतुल जोशी यांचा यात मोठा सहभाग होता.
या उपक्रमामुळे श्रावण महिन्यातील धार्मिक उत्साहात आणखी भर पडली असून, भाविकांनी आयोजकांचे आभार मानले.
