
जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभासद व ग्राहकांसाठी नुकत्याच संपन्न झालेल्या नवऊद्योगांना संधी आणि आर्थिक साक्षरता या विषयावरील कार्यशाळेत उद्घाटक म्हणून बोलताना आमदार संजय खोडके यांनी जिजाऊ बँकेचा नवोद्योगांना संधी आणि आर्थिक साक्षरता हा उपक्रम स्तुत्य असून अमरावती शहरांमध्ये नवीन उद्योजकांना जिजाऊ बँकेचे आर्थिक सहाय्य करण्याचे धोरण निश्चितपणे उत्कृष्टअसून शहराचा औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. त्यांच्याआमदारकीच्या पुढील काळात सातत्याने अमरावती शहरात विविध उद्योग निर्मिती करिता प्रयत्न करण्यात येईल व अमरावती अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंतांसाठी सेंटर फॉर एक्सलन्स निर्मिती करिता टाटा समूहासोबत आवश्यक समन्वयाने 200कोटीचे लवकरच संगणक सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करण्यात येईल असे त्यांनी प्रतिपादन केले.कार्यशाळेच्या उद्घाटनाकरिता प्रमुख अतिथी म्हणून सुलभा खोडके आमदार उपस्थित होत्या. बँकेतर्फे उद्घाटकाचे स्वागत शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी तर प्रमुख अतिथींचे स्वागत उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी केले. संचालक श्रीकांत टेकाडे, संचालक नितीन डहाके, डा.पल्लवी बारब्दे संचालिका यांनी अतिथींचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये जिजा बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी अमरावती शहरांमधील जिजाऊ बँक एक उत्कृष्ट बँक असून बँकेला 25 वर्षे पूर्ण झाल्याने रोप्य महोत्सवी वर्ष हे उद्योग वर्ष म्हणून घोषित केले असून सदर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात नवयुगांनीप्रमुख अतिथी सुलभाताई खोडके यांनी जिजाऊ बँकेचा नव उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य या उपक्रमात नवयुवकांनी उस्फूर्तपणे सहयोग घेऊन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उद्योगांकरिता सबसिडीच्या योजना घेऊन नवीन उद्योग सुरू केले पाहिजे असे आवाहन केले. नवउद्योगांना संधी या विषयावर दिपाली चांडक नाशिक यांनी तेव्हा आपल्या मार्गदर्शनात प्रत्येक उद्योगाने उद्यम आधार नोंदणी केलीच पाहिजे. पब्लिक प्रोकृ्रर्मेंट पॉलिसीअंतर्गत प्राडक्ट विक्री,आणि सरकारच्या विविध सबसीडीच्या योजनांची माहितीचे उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.आर्थिक साक्षरता व गुंतवणूक या विषयावर आयसीआयसीचे प्रशिक्षक संतोष शिरसीकर यांनी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बाबत ग्राहकांना परतावा चांगला मिळतो आणि ग्राहकांनी आपली गुंतवणूक बँक प्रॉपर्टी आणि म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट मध्ये केली पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचलन बँकेच्या प्रशासकीय अधिकारी अर्चना वाघमोडे यांनी केले कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त ग्राहक अधिकारी उपस्थित होते रिझर्व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखडे यांनी नवयुकांना रोजगाराच्या संधी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे म्हटल
