
मुर्तीजापुर तालुक्यातील ग्राम शेलूवेताळ येथील अक्षय खंडोबल्लाड ( ग्रामपंचायत सदस्य ) यांची लहान बहीण अस्मिता खंडोबल्लाड ही चार वर्षा आधी अकोला येथे रक्त न मिळाल्यामुळे उपचादरम्यान आपला जीव गमवावा लागला होता. याचा मोठा धक्का त्यांना बसला हातो. बोलताना ते सांगत होते की तेव्हा मी लहान होतो काहीच करू शकलो नव्हतो पण आता दरवर्षी बहिणीचे स्मरणार्थ तिच्या वाढदिवसाच्या निमित्त हा उपक्रम शेलूवेताळ येथे राबवत आहे. यंदा चार वर्ष झाले असून त्यांच्या या शिबीर ला जवळपास 40 लोकांनी रक्तदान करून अनोखा वाढदिवस साजरा केला. ब्लड डोनर अँड हेल्पर्स ग्रुप चे अध्यक्ष रविभाऊ माडकर व उपाध्यक्ष स्वप्नील जामनिक यांनी भेट देत आयोजक ग्रुप चा उत्साह वाढवला.*आयोजक* अक्षय खंडोबाल्लड, संकेत शिरसाठ, पंकज दाभाडे, किशोर गुद्दे, अभि सदार, गौरव सदार, अश्विन सदार, विकास मोहोड, सुरेश सदार, अमन सदार, विजय राऊत, अनिकेत खिराडे, समीर वानखडे, गौरव इंगोले, भूषण इंगोले, पप्पू दामोदर, करण वानखडे व सर्व मित्र परिवार शहर व ग्रामीण रुग्णसेवक उपस्थित होते.