
मूर्तिजापूर: सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय मूर्तिजापूर व अंकुर साहित्य संघ मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 28/8/2025 गुरुवार रोजी 11:30 वा.”येऊन बसा–अन खदखद हसा” विनोदी कविता आनी प्रबोध नात्मक काव्य रचना तसेच हास्य फुलवणाऱ्या किसान चा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात सिद्धार्थ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय मूर्तिजापूरच्या प्राचार्य मा. अर्चनाताई संजय तायडे मॅडम, उद्घाटक म्हणून स्वपरिचित साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते युवाश्री अनिल डाहेलकर होते, तर शेतकरी संघटनेचे नेते काव्य रसिक अरविंद तायडे ऋषिकेश बोबडे, कराओके गायक कवी कल्पक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे खास आकर्षण असणारे येऊन बसा चे निर्माते तथा अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे, फुकट नसीब कार धीरज चावरे, कळम धळम थेंब गजानन छबिले वराडी कवी दिनकर ठाकरे, युवा उद्योजक कवी सुनील लवाडे, यांनी आपल्या विनोदी कविता आणि हास्य फुलविणारे किश्यांनी तब्बल तीन तास विद्यार्थी आणि शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी रसिकांना खेळवून ठेवलं. कलाविष्कार संस्थेचे मिलिंद इंगळे यांनी थांब रमा थांब ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर बयान करणारी रचना सादर केली तर शाळेच्या शिक्षिका जयश्री शाहाकार मॅडम यांनी आपली कविता आणि चारोळ्या सादर केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज वानखडे सर यांनी केले तर आभार नागदिवे सर यांनी मांडले.
