अकोला पोलीस अधीक्षकांचा आदेश: डीजेवर निर्बंध! स्थानिक पोलीस अंमलबजावणी करणार का?

0
8

मूर्तिजापूर: आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस निरीक्षक अजित चांडक यांनी डीजेवर कठोर निर्बंध लादण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मूर्तिजापूर येथे झालेल्या विभागीय शांतता समिती बैठकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करत

डीजेसाठी ‘दोन बेस, दोन टॉप’ अशी मर्यादा घालून दिली.

या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र, शहरात आता या आदेशाच्या अंमलबजावणीवरच जोरदार चर्चा सुरू आहे.

डीजे निर्बंधांची खरी कसोटीपोलीस प्रशासनाने घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह असली तरी, गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता अनेक नागरिकांना या आदेशाच्या अंमलबजावणीबद्दल शंका आहे. “

*फक्त बैठकांमध्येच*

असे निर्णय घेतले जातात, पण प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन केले जात नाही,” असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेला हा आदेश स्थानिक ठाणेदार आणि उपविभागीय अधिकारी किती गांभीर्याने घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. *नागरिकांचे लक्ष स्थानिक प्रशासनाकडे* गणेश मंडळांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून तातडीने कारवाई केली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा आदेश केवळ औपचारिक आहे की खऱ्या अर्थाने याची अंमलबजावणी होणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता आणि नियमांचे पालन होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here