
अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत, पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार, आज दिनांक ०३/०९/२०२५ रोजी पिंजर पोलिसांनी कानडी, विरहित परिसरात मोठी कारवाई केली.पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन व्यक्ती मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारावर, पिंजर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.या छाप्यात पोलिसांना बॉबी संत्रा या देशी दारूच्या ९० मिलीलीटरच्या एकूण ६५० बाटल्यांचे ६.५ बॉक्स आढळले. या दारूची किंमत २६,००० रुपये आहे. पोलिसांनी दारूसह, एमएच ३० बीवाय ४५५७ क्रमांकाची १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण १,२६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणात, अमर उद्धव घोडे (वय २९, रा. टेंभी) आणि जनार्धन तुकाराम खंडारे (वय ७०, रा. विरहित) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी आणि एसडीपीओ वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गंगाधर दराडे, पीएसआय अभिषेक नवघरे, एएसआय दत्तात्रय चव्हाण, एचसी नागसेन वानखडे आणि पीसी वैभव मोरे यांनी पार पाडली.