
गजानन चौधरी तालुकाप्रमुख व विनायक गुल्हाने शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जन सुरक्षा कायद्याचा निषेध; कायदा रद्द करण्याची मागणी* मूर्तीजापूर: जनविरोधी आणि लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज मूर्तीजापूर शहर आणि तालुक्यात जोरदार आंदोलन केले. तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत सरकारच्या या कायद्याचा तीव्र निषेध केला. यावेळी तालुकाप्रमुख गजानन चौधरी यांनी या कायद्याचे दुष्परिणाम स्पष्ट करत, तो तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली. सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत तिवारी, शहरप्रमुख विनायक गुल्हाने, छबिले पाटील, मुन्ना नाईक नवरे, बंडू पाटील लाडे,विलास देशमुख सर्कल प्रमुख , उप तालुकाप्रमुख अमर ठाकरे, अमोल तांबडे, बाळासाहेब खांडेकर, निलेश आडळकर, बच्चुभाऊ देशमुख, मनोज गायकवाड , शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अरविंद तायडे, आणि, भीमराव गावंडे किशोर राहूत, विनोद महल्ले, अक्षय जगदेव छबिले, नुरू खा भाई, यांच्यासह शहर आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कायद्यामुळे सामान्य जनतेचे अधिकार हिरावले जातील आणि लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होईल, असे मत यावेळी गजानन चौधरी यांनी व्यक्त केले. या आंदोलनातून, सरकारने तातडीने जनतेची मागणी लक्षात घेऊन हा कायदा मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.