
प्रतिनिधी विशाल येलोरेमोहदा-घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दुर्गामातेचे जलोष्यात आगमन झाले आहे.मोहदा गावात जवळपास ९ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा मंडळात देवीची स्थापना झाली आहे.त्यामुळे नऊ दिवस सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण राहणार आहे.घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दुर्गामातेचे जलोष्यात आगमन झाले आहे.श्री सेवादास दुर्गात्सव मंडळ ,श्री साई दुर्गात्सव मंडळ ,बालयुवा दुर्गात्सव मंडळ,माँ शक्ती दुर्गात्सव मंडळ,जय हिंद दुर्गात्सव मंडळ,तरुणाई दुर्गात्सव मंडळ,जय अंबे दुर्गात्सव मंडळ,इंदिरा दुर्गात्सव मंडळ,जय माँ संतोषी दुर्गात्सव मंडळ मोहदा गावात जवळपास ९ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा मंडळात देवीची स्थापना झाली आहे.त्यामुळे नऊ दिवस सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण राहणार आहे .सार्वजनिक मंडळा कडून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे.आकर्षक रोषणाई ,दिव्यांच्या प्रकाश वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन आकर्षनचा बिंदू ठरत आहे.या नवरात्राच्या काळात प्रत्येक मंडळा जवळ दांडिया, गरबा, लहान मुलांचे खेळ यांची रेलचेल असते.मंडळाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये ,अश्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. पुडील नऊ दिवस अत्यन्त उत्साहात सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प अनेक मंडळांनी केला आहे.