
मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र श्री लक्षेक्ष्वर संस्थान लाखपुरी ता. मुर्तिजापूर जि . अकोला येथे हजारो वर्ष पुरातन व नवसाला पावणारी देवी सीतला माता मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र उत्सव सुरू आहे . सीतला मातेची मुर्ती कायम असल्यामुळे या मंदिरात नवरात्र उत्सवात विधिवत घट स्थापना करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली . सीतला माता नवयुवक उत्सव मंडळ व श्री लक्षेक्ष्वर महिला सेवाधारी मंडळ यांनी नवरात्र उत्सवात दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन केले असुन यामध्ये दररोज सकाळी 8 वाजता विधिवत पुजा व आरती , दुपारी भजन , सायंकाळी 7 वाजता महाआरती , रात्री 8 ते 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री 9 ते 11 वाजता गरबा , दांडिया अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . नऊ दिवस चालणाऱ्या सीतला माता नवरात्र उत्सवात पुजारी म्हणून सुधाकर सातरोटे , शंकर सुरदुसे सेवा देत असुन मंडळाचे असंख्य युवा व महिला सेवाधारी उपवास करून नवरात्र उत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे . अष्टमीला महाप्रसादाचे आयोजन केले असुन नवमीला पुर्णा नदीत घट विसर्जित करण्यात येईल . पंचकोशीतील भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासह आयोजीत सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री लक्षेक्ष्वर संस्थानच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे .






