साहित्य अभावामुळे भील बालिका कालिबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राळेगाव येथील ‘कोपा’ व्यवसायातील प्रशिक्षणार्थी बेमुदत सुट्टीवर

0
13

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- नरेश राऊतराळेगाव: दि. २९ राळेगाव येथील भील बालिका कालिबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे “कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट” (कोपा) या व्यवसायात प्रशिक्षण घेत असलेल्या २० प्रशिक्षणार्थींना आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री, उपकरणे तसेच तांत्रिक कच्चा माल उपलब्ध न झाल्यामुळे संस्थेच्या प्रशासनाने दिनांक २९ सप्टेंबर २०२५ पासून बेमुदत विश्रांती जाहीर केली आहे,संगणक शिक्षणात प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सैद्धांतिक ज्ञानाचे व्यावसायिक रूपांतरण हे अत्यंत अनिवार्य असते. तथापि, सद्यस्थितीत प्रशिक्षणासाठी आवश्यक संगणकीय यंत्रणा, सॉफ्टवेअर, तसेच पूरक साहित्य उपलब्ध नसल्यामुळे संबंधित प्रशिक्षण पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना केवळ थिअरीवर आधारित शिक्षणावर समाधान मानावे लागत आहे,संस्थेमध्ये सध्या ‘कोपा’ या व्यवसायात २० प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत असून, प्रत्यक्ष सरावाविना त्यांच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि व्यावसायिक क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. प्रशिक्षण प्रक्रियेतील ही व्यत्यय अत्यंत गंभीर मानली जात असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे,संस्थेच्या प्रशासनाचे प्रमुख प्राचार्य श्री. विशाल र. मिलमिले यांनी प्रशिक्षणार्थी यांचे मागणीवर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे कोपा प्रशिक्षणार्थी बेमुदत सुट्टीवर निवेदन देणारे अचल ग. झाडे, प्रशमेश ग. झाडे, वैष्णवी घरवाल, साक्षी गावंडे, मोनाश्री राऊत, शिवानी गुजरकर, द्रुप जवळेकर, यश देवतळे व इतर सर्व प्रशिक्षणार्थी ,या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून, पालकवर्गातही तीव्र नाराजीचे वातावरण आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अडचणींमुळे संधींपासून वंचित राहावे लागते, ही खेदजनक बाब आहे”, अशी भावना काही पालकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here