
दर्यापूर: प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमरावती (ग्रामीण) यांच्या वतीने दर्यापूर तालुक्यात नुकतीच तालुकास्तरीय पदाधिकारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.या बैठकीत तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच विविध आघाड्यांतील जबाबदार पदाधिकाऱ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दर्यापूर तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद (Z.P.) व पंचायत समिती (P.S.) निहाय संघटनात्मक बळकटी, स्थानिक जनसंपर्क मोहीम, मतदार संवाद आणि पक्ष संघटनेच्या धोरणात्मक तयारीवर विशेष चर्चा करण्यात आली.यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेचा अधिकाधिक प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीस ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष दादा महात्मे, जिल्हा संघटक शहीद भाई, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष ऍड. जगदीश विल्हेकर, दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा अध्यक्ष प्रा. डॉ. सुशिल गावंडे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण भुजाडे, युवक जिल्हाध्यक्ष अंकुश घारड, महिला आघाडी कार्याध्यक्ष सुषमाताई बर्वे, बाळासाहेब राऊत, चंद्रशेखर हुतके, बाबूभाई खान, सुनिल सोळंकी, पांडुरंग नागे, उद्धवराव नवलकार, तालुका अध्यक्ष निलेश मोपारी, शहराध्यक्ष अमोल गहरवार, जबिर भाई, निलेश जुनघारे, कपिल पोटे, किरण अरबट, कुलदीप काळे, शुभम होले, युवक अध्यक्ष नितिन गावंडे, शहराध्यक्ष युवक प्रतीक नाकट, सोहेल भाई खान, गौरव गावंडे, योगेश हिंगणकर, श्रीकांत पानझाडे, निलेश डालके, हर्षल खाडे, गजानन खेडकर, संतोष ढोकने, प्रथमेश रायपुरे, रोहित खंडारे, अघडते भाऊ, भूषण खंडारे, अश्विन कुकडे, ऋषीकेश शिंदे, निलेश भगत, अजय कथे, सुशांत कथे, योगेश खेडकर, सचिन नीचळ, संदीप जाणे, कृष्णा जाणे, गौरव बाळापुरे, आशिष राऊत, गणेश माहुरे, दीपक गवई, अमोल चव्हाण, मोहन अंभोरे, वैभव पवित्रकार, प्रकाश भाऊ मोपारी, चेतन भाऊ जुनघरे, अमोल भाऊ घुरडे, अजय भाऊ मोपारी, प्रशांत बोरखडे, पप्पू भाऊ राहटे आदींसह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.