
मा.श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशा प्रमाणें अकोला जिल्हयामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या लोकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आली.पोलीस स्टेशन हिवरखेड येथे दि.१७/१०/२०२५ रोजी पो.स्टे. हिवरखेड, अकोला हद्दीतिल हिवरखेड शहरात पोलीसांनी गुप्त माहीती मिळाली की आरोपी नामे अमीर खॉ तस्लीम खॉ रा. इंदीरा नगर हिवरखेड ता. तेल्हारा जि. अकोला याने याचे ताब्यातील लोखंडी शस्त्रे ही आरोपी नामे मकसूद खॉ शेर खॉ याचे ताब्यात दिली आहेत वरून पंच याचे मदतिंने रेड केली असता आरोपी नामे मकसूद खॉ शेर खॉ वय२२वर्षे रा. इंदिरा नगर, हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला याचे घरात रेड मारून पाहणी केली असता त्याचे घरातुन एकुण तीन लॉखडी तलवारी, २) एक लोखंडी कोयता, ३) दोन लोखंडी सुरे ४) एक लाकडी बाबुच्या काठीचे भाला त्याचे लोखंडी पाते असा एकुण १६,००/- रू. वा मुददेमाल जप्त करून आरोपीतांन विरुध्द पो.स्टे. ला अप.नं. २८०/२०२५ कलम ४,२५ शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित बांडक सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. बि. चंद्रकांत रेड्डी सा., मा. सहायक पोलीस अधिदाक श्री. निखील पाटील सा.यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. गजानन राठोड, पोउपनि गोपाल गिलबिले, पो. हया, गणेश साबळे, प्रमोद चव्हाण, राजेश वसे, पो. कॉ नितीन पाटील, म. पो. कॉ. अश्वीनी करवते, नेहा सोनवने यानी केली आहे.