
अकोला: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी आज दिवाळीच्या मंगलमय पर्वावर शहरातील सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देऊन सामाजिक सलोख्याचा एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मात्र, याच वेळी, स्वतःला ‘कट्टर हिंदुत्ववादी’ म्हणवणाऱ्या काही लोकप्रतिनिधींकडून दिवाळीच्या शुभेच्छांचा साधा एक शब्दही न आल्याने जिल्ह्यात तीव्र चर्चा आणि नाराजीचे वातावरण आहे.हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण आणि वादाच्या पार्श्वभूमीवर, अत्यंत अल्पशा मताधिक्याने निवडून आलेले आमदार साजिद खान पठाण यांनी आज अधिकृतपणे सर्व हिंदू भावांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, “हा सण केवळ दिव्यांचा नाही, तर बंधुभाव आणि एकतेचा आहे,” असे प्रतिपादन केले. अल्पसंख्याक समुदायाचे आमदार असूनही त्यांनी हिंदू सणाला दिलेले महत्त्व, त्यांच्यातील सर्वसमावेशक वृत्ती दर्शवते, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.’बटेंगे तो काटेंगे’ म्हणणाऱ्यांना दिवाळीचा विसर!याउलट, जे लोकप्रतिनिधी नेहमीच ‘बटेंगे तो काटेंगे’ (विभागले तर कापले जाईल) सारखी प्रक्षोभक विधाने करून हिंदुत्वाचा नारा देत असतात, त्यांना आज हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणाचा विसर पडल्याचे चित्र आहे. या नेत्यांनी स्थानिक हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी साधे औपचारिकताही दाखवली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त चर्चा रंगली आहे..”फक्त निवडणुका आल्यावरच हिंदुत्व जागे होते का?”जिल्ह्यात सध्या याच मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. “जे लोकप्रतिनिधी नेहमी धर्माच्या नावावर मते मागतात, त्यांना आज दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्याची गरज वाटली नाही. याचा अर्थ, त्यांचे हिंदुत्व केवळ निवडणुका आल्यावरच जागृत होते का?” असा थेट प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.अकोल्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “आमदार पठाण अल्पसंख्याक असूनही त्यांनी दिलेला शुभेच्छांचा संदेश अधिक महत्त्वाचा वाटतो, कारण त्यांच्या कृतीतून सामाजिक सलोखा दिसतो. दुसरीकडे, हिंदुत्वाचे राजकारण करणारे नेते केवळ मतपेटीसाठीच धर्माचा उपयोग करतात, हे त्यांच्या आजच्या मौनातून स्पष्ट झाले आहे.”सध्या सुरू असलेल्या या चर्चेमुळे, अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लोकप्रतिनिधींनी सणांच्या निमित्ताने तरी राजकारण बाजूला ठेवून जनतेला जोडण्याचे काम करावे, अशी अपेक्षा सामान्य मतदार व्यक्त करत आहेत.







