साप्ताहिक आत्मबल दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

0
9

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- नरेश राऊत पाच दशकापासून जनतेच्या प्रश्न|चा आवाज बनलेल्या साप्ताहिक आत्मबल दिवाळी विशेषांकाचे धनत्रयोदशी च्या शुभ मुहूर्तावर प्रकाशन झाले. या वेळी सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेस्ट पत्रकार मोहन देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून महेश शेंडे, डॉ. कैलास वर्मा, राजू रोहणकर हे मान्यवर उपस्थित होते. साप्ताहिक आत्मबल कार्यालयात प्रकाशन सोहळा पार पडला.या वेळी मोहन देशमुख यांनी साप्ताहिक आत्मबल च्या यशस्वी वाटचालीवर भाष्य केले. पत्रकार डॉ. कैलास वर्मा यांनी पत्रकारिता क्षेत्रासमोरील आव्हाने या विषयावर विचार मांडले. राजू रोहणकर यांनी संपादक मंगेश राऊत व राऊत मित्रपरिवार यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. या वेळी मोहनजी देशमुख, राजूभाऊ रोहनकर, महेशभाऊ शेंडे, डॉ. कैलासजी वर्मा, अशोकराव पिंपरे, फिरोजभाऊ लाखाणी, मनोहर बोभाटे,किरणभाऊ हांडे, प्रकाशभाऊ खुडसंगे, संजयभाऊ दुरबुडे पत्रकार उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंदभाऊ तामगाडगे, लायन्स बहुद्देशीय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सय्यद लियाकतभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ कन्नाके, नगरसेवक बाळासाहेब धुमाळ, मधुकरभाऊ राजूरकर, माजी नगरसेवक प्रदीप लोहकरे, अफसरअली सय्यद, नितीनभाऊ कोमेरवार, नारायणभाऊ धानोरकर, अनिलभाऊ गलांडे, रुपेश कोठारे, मनोज पेंदोर, राहुल बहाळे, प्रवीण काकडे, प्रकाश देवकर, सुमित राऊत, अंकुश वड्डे, आयुष राऊत, महादेवराव ससाने, यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्याचे संचालन व आभार मनीषभाऊ काळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here