
पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी 20 हजार 731 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; राष्ट्रीय एकता, व एकात्मतेचा संदेश..!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन” औचित्य साधून पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सार्वजनिक ठिकाणी पोलीस बैंड पाथकाचे देशभक्ती पर सादरीकरण, वॉक, शपथ असे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पोलीस मुख्यालय अकोला येथे श्रीमती वर्षा मीना जिल्हाधिकारी अकोला यांच्या प्रमुख उपस्थित अकोला पोलीसांनी आयोजित केलेल्या – रन फॉर यूनिटी’ या ०३ किमी धावण्याच्या उपक्रमात नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पौलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात जिल्ह्यात 20 हजार 731 हून अधिक नागरिकांनी सहभागी होऊन एकता, सामाजिक बांधिलकी आणि फिटनेसचा संदेश दिला. त्या अनुषंगाने दिनांक 31.10.2025 रोजी सकाळी ६.३० वाजता या प्रसंगी कार्यक्रमाची सुरवात पोलीस मुख्यालय अकोला येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने मान्यवारांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांनी आपल्या प्रस्ताविक मनोगतातुन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रा वर प्रकाश टाकला, भारतीय एकता व अखंडते करीता मोलाचे योगदान लौहपुरुष सरदार वल्लभभाई यांनी दिले आहे, त्याची 150 वी जयंती निमित्याने रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याबाबत माहिती दिली.या प्रसंगी जिल्हाधिकारी मॅडम यांनी अकोला पोलीस दलाचे आयोजना कौतुक केले आणि सांगितले की, “एकता, अनुशासन आणि सामूहिक सहभाग हाच देशाच्या प्रगतीचा पाया आहे. अकोला पोलिसांनी घेतलेली ही पुढाकार आदर्शवत आहे.” असे मत व्यक्त केले. त्या नंतर मान्यवारांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखऊन सुरवात करण्यात आली. पोलिस मुख्यालयातून रवाना झालेल्या धावपटूंनी सरकारी बगीचा – कलेक्टर ऑफिस अशोक वाटिका पोलिस अधीक्षक कार्यालय लक्झरी स्टैंड मार्गे पोलिस मुख्यालयात परत येत दौड पूर्ण केली. यात नागरिकांबरोबर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य व फिटनेसविषयी जागृती निर्माण करणे हे होते. दौड दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. दौड मध्ये, विध्यार्थी, सामाजिक संघटना, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकैडमी, कॉलेज, कोचिंग क्लासेस, जेष्ठ नागरिक, मुलं, मुली, यांनी सहभाग नोंदविला. स्वाक्षरी बोर्ड वर मान्यवरांनी आपला अभिप्राय नोंदवून स्वाक्षरी केली. कार्यक्रमा करीता अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पौलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, सर्व अकोला शहरातील सर्व ठाणेदार, शाखा प्रभारी, अधिकारी, पोलीस प्रशिक्षण अकोला येथील अधिकारी, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामीण भागात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, व ठाणे प्रभारी यांनी पोलीस स्टेशन स्तरावर आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता, राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमानके, यांची टीम यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम मध्ये उपस्थित असलेले सर्व नागरिकांना ऑनलाईन डिजिटल प्रशस्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमा मध्ये गझलकार श्री गोपाल मापारी, यांनी बहारदार कविता, सादरीकरण केले, तर सेवानिवृत्त पोलीस हवालदार श्री संजय वाघ यांनी देशभक्ती पर गीत सादरीकरण केले, कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री डी. प्रदीप अवचार, व पोलीस हवालदार गौपल मुकुंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सुदर्शन पाटील उपविभाग पीलीस अधिकारी शहर विभाग यांनी केले.







